-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
Copy path201803071203178325.pdf.mr.txt
10 lines (10 loc) · 4.61 KB
/
201803071203178325.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
# Page 1
अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभेने पारित केलेले ठराव क्र.२९६ दिनांक २१/१०/२०१६ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ (३) अन्वये अंतिमत: विखंडीत करणेबाबत...
महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक-अमपा-२०१७/प्र.क्र.४३/नवि-२६
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ०७/०३/२०१८
वाचा :- १) अमरावती महानगरपालिकेचे पत्र क्र.अमनपा/आयुक्त/४८९/२०१७, दिनांक २७/०३/२०१७ २) अमरावती महानगरपालिकेचे पत्र क्र.अमनपा/ससंनर/९७७/२०१७, दिनांक ०९/०६/२०१७ ३) शासन निर्णय, समक्रमांक दिनांक २७/०७/२०१७ व दि.२८/०७/२०१७ ४) आयुक्त, अमरावती मनपा यांचे पत्र क्र.अमनपा/आयुक्त/ससंनर/१६७०/२०१७ दि.२३/०८/२०१७ प्रस्तावना : आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांच्या संदर्भाधीन क्र. ०१ येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुलक्षून अमरावती महानगरपालिका, स्थायी समिती सभा ठराव क्र.२९६ दिनांक २१/१०/२०१६ हा संदर्भाधीन क्र.०३ येथील शासन निर्णयान्वये तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे. या संदर्भाधीन क्र.०३. येथील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांनी संदर्भाधीन क्र.०४ येथील पत्रान्वये त्यांचे अभिवेदन सादर केलेले आहे. तथापि, याबाबत आजअखेर अमरावती महानगरपालिकेने कोणतेही अभिवेदन सादर केलेले नाही.
या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेने पारित केलेला ठराव क्र. २९६ दि.२१/१०/२०१६ हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण अठ्ठावीस कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडीत रण्यात यावा, असे आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांनी संदर्भाधीन क्र.४ येथील संदर्भान्वये शासनाकडे पाठविलेल्या अभिवेदनाच्या आधारे अमरावती महानगरपालिका, स्थायी समिती सभा ठराव क्र.२९६ दि.२१/१०/२०१६ हा अंतिमत: विखंडीत करणेबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय : अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभा ठराव क्र.२९६ दि.२१/१०/२०१६ हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडीत झाल्याचे मानण्यात येत आहे.