-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202103231328393119.pdf.mr.txt
40 lines (40 loc) · 15.9 KB
/
202103231328393119.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
# Page 1
सन २०२० - २१ या आर्थिक वर्षाकरीता सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण (४४०६ ०४९२) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांकः साववि-२०२१/प्र.क्र.१/फ-११
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २३.३.२०२१
वाचा : १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२०/प्र.क.६४/अर्थ-३, दि.१६.०४.२०२० २) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अर्थसं २०२०/प्र.क.६५/अर्थ-३, दि.०४.०५.२०२० ३) वित्त विभाग,शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२०/प्र.क.६४/अर्थ-३, दि.१०.११.२०२० ४) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२०/प्र.क.६४/अर्थ-३, दि.१५.३.२०२१ ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) म.रा. नागपूर, यांचे पत्र क्र.कक्ष-१/पी/ यो/नबाप्र/प्र.क्र.०४/३३७/२०२०-२१,दि.०८.०१.२०२१.
६) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) म.रा. नागपूर, यांचे पत्र क्र.कक्ष-१/पी/ यो/नबाप्र/प्र.क्र.२१(१९-२०)/SFD/३१५/२०२०-२१,दि.२१.१२.२०२०.
७) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास ) म.रा. नागपूर, यांचे पत्र क्र.कक्ष-१/पी/ यो/नबाप्र/प्र.क्र.०६/२०२०-२१/३२६,दि. ३०.१२.२०२० ८) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) म.रा. नागपूर, यांचे पत्र क्र.कक्ष-१/पी/ यो/नबाप्र/प्र.क्र.०४/२०२०-२१/३६७,दि. ३.२.२०२१ ९) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) म.रा. नागपूर, यांचे पत्र क्र.कक्ष-१/पी/ यो/नबाप्र/प्र.क्र.०४/२०२०-२१/५०३, दि. २२.३.२०२१
१०) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक साववि-२०२०/प्र.क्र.४४/फ-११, दि.२१ जुलै २०२० ११) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक साववि-२०२०/प्र.क्र.४४/(२)फ-११,दि.७ ऑगस्ट २०२० १२) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक साववि-२०२०/प्र.क्र.४४/फ-११,दि.२१ जानेवारी २०२१ १३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय समक्रमांक,दि.२६ फेब्रुवारी २०२१
प्रस्तावनाः वन आणि वनेतर क्षेत्रात वृक्ष लागवड व संवर्धन करण्याकरीता राज्य योजनेंतर्गत सन २०२०-२१ करीता “सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम ( ४४०६ ०४९२ ) " या योजनेंतर्गत सुधारित अंदाज रु.६१३४९.४४ लक्ष इतका निधी (०२-मजूरी रु.४६३४९.२८ लक्ष + २१ पुरवठा व सामग्री - रु.१५०००.१६ लक्ष) मान्य करण्यात आला आहे.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक, ( अर्थसंकल्प, नियोजन व विकास ) यांनी सदर्भाधीन क्र.५,६,७, व ८ च्या पत्रान्वये रू.२२३७६.५६ लक्ष एवढा निधी सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम (४४०६०४९२) योजनंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी पूर्व पावसाळी कामांकरिता उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. वित्त विभागाने मजूरी उदिष्टासाठी ६५ टक्के व सामग्री पुरवठा उदिष्टासाठी २० टक्के निधी वितरणास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दिनाक २६.२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये याबाबतचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
# Page 2
शासन निर्णय क्रमांकः साववि-२०२१/प्र.क्र.१/फ-११
३. वित्त विभाग, शासन परिपत्रक, दिनांक १५.३.२०२१ अन्वये आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी ०२ मजूरी उदिष्टांतर्गत संपूर्ण निधी बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम ( ४४०६ ०४९२ )" या योजनेंतर्गत योजनांसाठी ०२ मजूरी उदिष्टांतर्गत अर्थसंकल्पीत करण्यात आलेला रु.४६३४९.३० लक्ष निधी १०० टक्के वितरणासाठी उपलब्ध होत आहे. त्यापैकी आतापर्यंत संदर्भाधीन क्र.१०,११,१२ व१३ येथील शासन निर्णयान्वये ०२ मजूरी उदिष्टांतर्गत वितरीत करण्यात आलेला रू.४३१२८.०१ लक्ष निधी वजा करता रु.३२२१.२९ लक्ष एवढा निधी वितरणासाठी उपलब्ध होत आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक, ( अर्थसंकल्प, नियोजन व विकास ) यांनी सदर्भाधीन क्र. ९ च्या पत्रान्वये सदर योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे. संदर्भीय क्र.४ च्या परिपत्रकानुसार ०२ मजूरी उदिष्टांतर्गत अनुदान वितरणाचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात आले आहेत. त्यानुसार सदर योजनेंतर्गत निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय : सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात (००) (०६) सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम (४४०६०४९२) या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ०२ मजुरी उदिष्टांतर्गत खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
(रु. लक्ष )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| अ. क्र. | सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण | सुधारित अर्थसंकल्पित निधी | बीडीएस वर उपलब्ध करून दिलेला निधी | यापूर्वी वितरीत करण्यात आलेला निधी | शिल्लक निधी | वितरीत निधी |
| ०२ - मजूरी | ०२ -मजूरी | ०२ - मजूरी | ०२ -मजूरी |
| १ | वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम | ६१३४९.४४ | ४६३४९.३० | | ४३१२८.०१ | ३२२१.२९ | ३२२१.२९ |
| | महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा टेकडयांचे हरितीकरण |
| ३. | महत्वाचे रस्ते/रेल्वे / कालवे/ दुतर्फा वृक्ष लागवड |
| | एकूण | ६१३४९.४४ | ४६३४९.३० | | ४३१२८.०१ | ३२२१.२९ | ३२२१.२९ |
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर हे राहतील. त्यांच्या मागणीनुसार हा निधी पूर्व पावसाळी कामांसाठी सुपूर्द करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत घ्यावयाच्या कामाची अंमलबजावणी कृती आराखड्याप्रमाणे, विहित कार्यपध्दतीनुसार आणि ठरविलेल्या मुदतीत करण्याबाबत दक्षता घ्यावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना
पृष्ठ ४ पैकी २
# Page 3
शासन निर्णय क्रमांकः साववि-२०२१/प्र.क्र.१/फ-११
द्याव्यात आणि अंमलबजावणीबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सदर निधी मंजूर असलेल्या योजनांवरच खर्च करण्यात यावा. मंजूर निधीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.
३. सदर निधी वितरित करण्यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) यांनी सदर योजनेसाठी, सन २०१९-२० करिता वितरित केलेला निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली व्यतिरिक्त अन्यत्र ठिकाणी वळती केला नसल्याची खात्री करावी. या अटीच्या अधीन निधी वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.
४. सदर निधी खर्च करताना वित्त विभागाच्या संदर्भाधिन परिपत्रकातील तरतूदी व महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामध्ये उल्लेख केलेल्या तरतुदींनुसार व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. सदर निधी दि.३१.३.२०२१ पर्यंत निश्चितपणे खर्च होईल याची खात्री करावी. सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय अधिकारी/मंडळे/महामंडळे यांच्या बँक खात्यात, स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेख्याबाहेर ठेवता येणार नाही.
५. जिल्हानिहाय वितरीत तरतुदीची माहिती व राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची/झालेल्या खर्चाचा तपशील शासनास दरमहा विहित प्रपत्रात सादर करण्यात यावा. तसेच योजनेचे संनियंत्रण प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्यामार्फत व्हावे.
६. सदर योजने अंतर्गत होणारा खर्च खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली सन २०२०-२१ च्या मंजूर अर्थसंकल्पीत निधीतून खर्ची टाकण्यात यावा.
“मागणीक्र.सी-१०, ४४०६ वनीकरण व वन्यजीवन यावरील भांडवली खर्च, (००) (०६) सामुहिक पातळीवर ठोस वनरोपन (४४०६ ०४९२).
०२- मजूरी
७ सदर शासन निर्णय संदर्भ क्रमांक ४ येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रकनुसार विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
# Page 4